![]() |
खाजगी शिकवण्यांमध्ये सभेची माहिती देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर |
![]() |
पथनाट्यानंतर सभेचे निमंत्रण देतांना श्री. प्रशांत जुवेकर |
२५ डिसेंबर या दिवशी जळगाव
परिसरात होणार्या ५६ व्या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने केलेल्या
प्रसारकार्यातील काही ठळक सूत्रांचा आढावा येथे देत आहोत.
शहरामध्ये विविध भागांत सभांचे आयोजन अनेक धर्माभिमानी स्वतःहून करत, तसेच त्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयकांना ‘व्हॉट्स अॅप’ या सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून कळवत.
२. प्रसार बैठका !
२ अ. शहरामध्ये १००, तर ग्रामीण भागात ९० बैठका होणे : प्रसार
बैठकांच्या दृष्टीने ग्रामीण आणि शहरी भाग यांमध्ये काही मार्ग ठरवले
होते. त्यात ग्रामीण भागाचे ३ मार्ग ठरवून त्यांतील एकूण १०० गावांमध्ये
प्रसार करण्याचे ठरवले. सभेच्या दिवसापर्यंत शहरामध्ये एकूण १००, तर
ग्रामीण भागात ९० बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमुळे सभेचा विषय १२ सहस्र
५०० हून अधिक धर्माभिमानी हिंदूंपर्यंत पोचला.
२ आ. बैठकांमध्ये सभेला उपस्थित रहाण्याचे नियोजन करणे : विविध ठिकाणी घेण्यात येणार्या बैठकांमध्ये ‘राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात’, हा विषय मांडून सभेचे महत्त्व सांगितले. त्यानंतर धर्माभिमानी हिंदू सभेच्या प्रसारामध्ये कसे सहभागी होऊ शकतात, याविषयी माहिती दिली. सभेसाठी स्थानिक नागरिकांना सभास्थळी घेऊन येण्याचे, तसेच भगवे ध्वज, ढोल-ताशे यांसह येण्याचे नियोजन केले.
२ इ. पूर्वनियोजनाची बैठक घेणे आणि त्यात प्रचारप्रसाराची माहिती देणे : धर्मजागृती सभेच्या निमित्ताने २० नोव्हेंबरला झालेल्या पूर्वनियोजनाच्या बैठकीला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि अन्य धर्माभिमानी मिळून २०० हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. त्यामध्ये जळगाव येथे गेल्या वर्षी झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. या बैठकीत धर्मजागृती सभेचा प्रसारप्रचार करण्यासाठी लागणारे फ्लेक्स फलक, मोठी होर्डिंग्ज, भीत्तीपत्रके आणि हस्तपत्रके ही कशा प्रकारची असतात अन् त्यासाठी होणारा व्यय याचे ‘पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन’ प्रोजेक्टवर दाखवण्यात आले. त्यानंतर त्यामध्ये सहभागी असलेल्या अनेक युवा धर्माभिमान्यांनी वरील सर्व प्रकारचे प्रचारसाहित्य प्रायोजित केले.
२ ई. कोपरा बैठका घेणे : सायंकाळी ७ नंतर रात्री ११ वाजेपर्यंत चौकाचौकांत, रस्त्यांवर आणि कट्ट्यांवर अनेक तरुण मुले एकत्र गप्पा मारण्यास बसलेली असतात. अशा ५५ ठिकाणी काही धर्माभिमान्यांनी जाऊन त्या ठिकाणच्या तरुणांना एकत्र करून कोपरा बैठका घेतल्या.
३ आ. मंदिरांतून आरती असलेल्या दिवशी प्रसार : शहरामध्ये गुरुवार आणि शनिवार या दिवशी अनेक ठिकाणी आरती असते. अशी ठिकाणे शोधून त्या मंदिरांमध्ये जाऊन सभेचा विषय मांडला. अशा आरती केल्या जाणार्या मंदिरांमध्ये किमान २५ ते कमाल ३०० उपस्थिती असायची. त्यामळे हा विषय शेकडो जणांपर्यंत पोचला.
७. शहरातील काही मैदाने आणि बाग अशा ठिकाणी पहाटेच्या वेळी अनेक जण सकाळी फिरायला येतात. त्या ठिकाणीही समितीच्या कार्यकर्त्यांनी सभेचा विषय सांगून निमंत्रण दिले.
१०. शहराच्या विविध भागांत मोठ्या आकाराची ३० हून अधिक होर्डिंग लावण्यात आली. मोठी होर्डिंग काही धर्माभिमानी युवक आणि संघटना यांनी स्वतः छपाई करून लावली.
२. ‘फेसबूक’ या सामाजिक संकेतस्थळावरील ‘हिंदु जनजागृती समिती जळगाव’ या पानावर त्या ३ ध्वनीचित्रफिती ‘अपलोड’ केल्यावर एकूण २ लाख ८६ सहस्र ५१३ जणांपर्यंत त्याची मार्गिका (लिंक) पोचली, तर ६३ सहस्र ७०० जणांनी या ध्वनीचित्रफिती पाहिल्या.
३. सभेनिमित्त सिद्ध केलेल्या ध्वनीचित्रफितीमुळे ‘हिंदु जनजागृती समिती जळगाव’ या ‘फेसबूक’ पानाला २ आठवड्यांत १ सहस्राहून अधिक जणांनी पसंती दर्शवली. सध्या या पानाची मार्गिका ३ लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोचली.
४. सभेनिमित्त काढण्यात आलेल्या वाहनफेरीचे ‘फेसबूक’हून थेट प्रक्षेपण केल्यावर त्याची मार्गिका २० सहस्र जणांपर्यंत पोचली. ते प्रक्षेपण ५ सहस्र ५०० जणांनी पाहिले.’
१. छोट्या हिंदु धर्मजागृती सभांद्वारे प्रचार !
मोठ्या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचारार्थ ३ गावांमध्ये छोट्या हिंदु
धर्मजागृती सभांचे आयोजन गावातील स्थानिक धर्माभिमान्यांनी केले होते. या
धर्मजागृती सभांच्या ठिकाणीही गावातील युवकांनी उत्स्फूर्तपणे वाहनफेर्या
आणि पदफेर्या काढल्या होत्या. प्रसार आणि लागणारी अन्य व्यवस्थाही स्थानिक
धर्माभिमान्यांनी केली. शहरामध्ये विविध भागांत सभांचे आयोजन अनेक धर्माभिमानी स्वतःहून करत, तसेच त्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयकांना ‘व्हॉट्स अॅप’ या सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून कळवत.
![]() |
महाविद्यालयामध्ये पथनाट्य सादर करतांना धर्माभिमानी |
![]() |
एका स्थानिक आधुनिक व्यायामशाळेत (जिममध्ये) सभेचा विषय मांडतांना धर्माभिमानी |
२ आ. बैठकांमध्ये सभेला उपस्थित रहाण्याचे नियोजन करणे : विविध ठिकाणी घेण्यात येणार्या बैठकांमध्ये ‘राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात’, हा विषय मांडून सभेचे महत्त्व सांगितले. त्यानंतर धर्माभिमानी हिंदू सभेच्या प्रसारामध्ये कसे सहभागी होऊ शकतात, याविषयी माहिती दिली. सभेसाठी स्थानिक नागरिकांना सभास्थळी घेऊन येण्याचे, तसेच भगवे ध्वज, ढोल-ताशे यांसह येण्याचे नियोजन केले.
२ इ. पूर्वनियोजनाची बैठक घेणे आणि त्यात प्रचारप्रसाराची माहिती देणे : धर्मजागृती सभेच्या निमित्ताने २० नोव्हेंबरला झालेल्या पूर्वनियोजनाच्या बैठकीला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि अन्य धर्माभिमानी मिळून २०० हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. त्यामध्ये जळगाव येथे गेल्या वर्षी झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. या बैठकीत धर्मजागृती सभेचा प्रसारप्रचार करण्यासाठी लागणारे फ्लेक्स फलक, मोठी होर्डिंग्ज, भीत्तीपत्रके आणि हस्तपत्रके ही कशा प्रकारची असतात अन् त्यासाठी होणारा व्यय याचे ‘पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन’ प्रोजेक्टवर दाखवण्यात आले. त्यानंतर त्यामध्ये सहभागी असलेल्या अनेक युवा धर्माभिमान्यांनी वरील सर्व प्रकारचे प्रचारसाहित्य प्रायोजित केले.
२ ई. कोपरा बैठका घेणे : सायंकाळी ७ नंतर रात्री ११ वाजेपर्यंत चौकाचौकांत, रस्त्यांवर आणि कट्ट्यांवर अनेक तरुण मुले एकत्र गप्पा मारण्यास बसलेली असतात. अशा ५५ ठिकाणी काही धर्माभिमान्यांनी जाऊन त्या ठिकाणच्या तरुणांना एकत्र करून कोपरा बैठका घेतल्या.
३. धार्मिक कार्यक्रमांमध्ये प्रसार !
३ अ. कीर्तन महोत्सव आणि भागवत सप्ताह यांतून प्रसार :
प्रसाराच्या कालावधीत शहर आणि ग्रामीण भागात ज्या ज्या ठिकाणी कीर्तन
महोत्सव अन् भागवत सप्ताह आयोजित केले होते, त्या ठिकाणी समितीचे
कार्यकर्ते सभेचा विषय मांडायचे. असे महोत्सव आणि सप्ताह या ठिकाणी किमान
१५० ते कमाल ७०० या संख्येने भाविक उपस्थित असायचे. त्यामुळे अल्प कालावधीत
अत्यंत प्रभावीपणे जनसामान्यांपर्यंत विषय पोचला. समितीचे कार्यकर्ते
घरोघर प्रसार करत असतांना अनेक महिलांनी सांगितले की, आम्ही घरची सर्व कामे
लवकर उरकून सभेला येणार आहोत. ३ आ. मंदिरांतून आरती असलेल्या दिवशी प्रसार : शहरामध्ये गुरुवार आणि शनिवार या दिवशी अनेक ठिकाणी आरती असते. अशी ठिकाणे शोधून त्या मंदिरांमध्ये जाऊन सभेचा विषय मांडला. अशा आरती केल्या जाणार्या मंदिरांमध्ये किमान २५ ते कमाल ३०० उपस्थिती असायची. त्यामळे हा विषय शेकडो जणांपर्यंत पोचला.
४. शिक्षणसंस्थांमध्ये प्रसार !
महाविद्यालये आणि खाजगी शिकवणीवर्ग (कोचिंग क्लासेस) या ठिकाणी सभेचा विषय
मांडून सर्वांना निमंत्रणे देण्यात आली. यामुळे शेकडो युवक आणि युवती
यांच्यापर्यंत विषय पोचला. तसेच काही महाविद्यालयांमध्ये सभेच्या अनुषंगाने
सिद्ध केलेले पथनाट्य दाखवण्यात आले. त्या पथनाट्यामधून महिलांची
असुरक्षितता आणि त्यांचे सक्षमीकरण, भ्रष्टाचार निर्मूलन आणि पाश्चिमात्य
कुसंस्कृतीला आळा घालणे, यांविषयी जागृती करण्यात आली. या पथनाट्यानंतर १०
हून अधिक युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाची मागणी केली.
५. लग्नकार्यात प्रसार !
एका हितचिंतकाच्या विवाहामध्ये समितीच्या कार्यकर्त्यांनी सभेचा विषय
मांडून १ सहस्र जणांना निमंत्रण दिले. त्यानंतर एका कट्टर धर्माभिमान्याने
आपल्या स्वतःच्या विवाहामध्ये वरातीनंतर सभेचे निमंत्रण उपस्थितांना
देण्यास समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले. त्यामुळे अनेकांपर्यंत विषय
पोचण्यास साहाय्य झाले.
६. ‘डीजे’ व्यावसायिकाचा सभेच्या निमंत्रणाची ध्वनीफीत लावून प्रसार
एका धर्माभिमान्यांचा ‘डीजे’ ध्वनीक्षेपकाचा व्यवसाय आहे. ते ज्या ज्या
कार्यक्रमात ‘डीजे’ ध्वनीक्षेपक लावत, त्या ठिकाणी ते सभेच्या निमंत्रणाची
ध्वनीफीत लावायचे. त्यामुळेही अनेकांपर्यंत सभेचा विषय पोचला आणि प्रसार
झाला. ७. शहरातील काही मैदाने आणि बाग अशा ठिकाणी पहाटेच्या वेळी अनेक जण सकाळी फिरायला येतात. त्या ठिकाणीही समितीच्या कार्यकर्त्यांनी सभेचा विषय सांगून निमंत्रण दिले.
८. भित्तीपत्रके आणि स्टिकर यांद्वारे प्रसार !
शहरातील अनेक रिक्शा, खाजगी बसगाड्या आणि विविध प्रकारची दुकाने या ठिकाणी
सभेची भीत्तीपत्रके आणि स्टिकर लावण्यात आली. ‘रेडियम स्टिकर’चा व्यवसाय
असलेल्या एका हिंदूने दुचाकी वाहनांवर पुढे आणि मागे लावण्यासाठी ‘रेडियम
स्टिकर’ अत्यल्प दरात सिद्ध करून दिले. हे स्टिकर ४०० वाहनांवर लावण्यात
आले.
९. विविध मंडळे आणि मंदिरे यांच्या फलकांवर निमंत्रणांचेे लिखाण
शहरामध्ये विविध मंडळे आणि मंदिरे यांच्या चौकांमध्ये असलेल्या १०० हून
अधिक फलकांवर शौर्य जागवणारी, प्रेरणा आणि उत्साह देणारी काही वाक्ये
यांसहित विविध रंगांमध्ये आणि आकर्षक स्वरूपात निमंत्रण देणारे लिखाण
करण्यात आले. १०. शहराच्या विविध भागांत मोठ्या आकाराची ३० हून अधिक होर्डिंग लावण्यात आली. मोठी होर्डिंग काही धर्माभिमानी युवक आणि संघटना यांनी स्वतः छपाई करून लावली.
११. धर्माभिमानी महिलांचा सायकलवर मेगाफोन लावून प्रसार !
अनेक ठिकाणी महिला धर्माभिमान्यांनी दूरवरच्या भागात सायकलवर मेगाफोन लावून
घरोघर प्रसार केला. त्या महिलांनी हा प्रसार करतांना लांब जातांना चारचाकी
वाहनातून सायकली नेल्या आणि त्या त्या भागात सायकली उतरवून गल्लोगल्ली
प्रसार केला. यामुळे शहरातील ५० टक्के भागात सभेचे निमंत्रण पोचले. यावेळी
अनेक जिज्ञासूंनी धर्मसभेसाठी विविध प्रकारचे धान्य अर्पण दिले.
१२. प्रसिद्धीमाध्यमांद्वारे प्रसार !
स्थानिक दूरचित्रवाहिनी ‘युवा महाराष्ट्र’ने हिंदु जनजागृती समितीचे
महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांची एक छोटीशी मुलाखत घेऊन ती
प्रसिद्ध केली. तसेच सभेच्या निमंत्रणाची तळपट्टीही प्रसारित केली.
‘ईबीएम्’ या स्थानिक दूरचित्रवाहिनीने धर्मजागृती सभेसाठी सिद्ध केलेली एक
ध्वनीचित्रफीत दाखवली. ‘दैनिक तरुण भारत’ या वृत्तपत्राने श्री. सुनील घनवट
यांची मुलाखत प्रसिद्ध केली.
‘फेसबूक’ आणि ‘व्हॉटस् अप’ या सामाजिक संकेतस्थळांच्या
माध्यमातून असा झाला हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार !
१.
‘हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने ‘देश बदल रहा है, हिंदु राष्ट्र की
ओर बढ रहा है ।’ या बोधवाक्यानुरूप ३ ध्वनीचित्रफिती सिद्ध करण्यात आल्या
होत्या. त्या ध्वनीचित्रफिती ‘फेसबूक’ आणि ‘व्हॉटस् अप’ या सामाजिक
संकेतस्थळाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ (प्रसारित)
झाल्या. ‘व्हॉटस् अप’च्या माध्यमातून सभेचा विषय ६५ सहस्रांहून अधिक
हिंदूंपर्यंत पोचला. येथील सभेसाठी ‘#ChaloJalgaon’ हा ‘हॅशटॅग’ सिद्ध
करण्यात आला होता. माध्यमातून असा झाला हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार !
२. ‘फेसबूक’ या सामाजिक संकेतस्थळावरील ‘हिंदु जनजागृती समिती जळगाव’ या पानावर त्या ३ ध्वनीचित्रफिती ‘अपलोड’ केल्यावर एकूण २ लाख ८६ सहस्र ५१३ जणांपर्यंत त्याची मार्गिका (लिंक) पोचली, तर ६३ सहस्र ७०० जणांनी या ध्वनीचित्रफिती पाहिल्या.
३. सभेनिमित्त सिद्ध केलेल्या ध्वनीचित्रफितीमुळे ‘हिंदु जनजागृती समिती जळगाव’ या ‘फेसबूक’ पानाला २ आठवड्यांत १ सहस्राहून अधिक जणांनी पसंती दर्शवली. सध्या या पानाची मार्गिका ३ लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोचली.
४. सभेनिमित्त काढण्यात आलेल्या वाहनफेरीचे ‘फेसबूक’हून थेट प्रक्षेपण केल्यावर त्याची मार्गिका २० सहस्र जणांपर्यंत पोचली. ते प्रक्षेपण ५ सहस्र ५०० जणांनी पाहिले.’
प्रसार करतांना गायवासरे समवेत येणे आणि तिथे चांगला प्रतिसाद मिळणे !
घरोघरी प्रसार करत असतांना अनेक हिंदुत्वनिष्ठ महिलांसमवेत त्या भागातील
गायी आणि वासरेही फिरायची. ही गाय-वासरे या महिलांसमवेत पुढे अथवा मागे तरी
असायची आणि अशा भागात चांगला प्रतिसादही मिळायचा, अशी अनुभूती त्या महिला
हिंदुत्वनिष्ठांनी अनेकदा घेतली.