वाराणसी - १३ सप्टेंबर २०१६ या दिवशी बकरी ईदच्या निमित्ताने वाराणसीतील मदनपुरा (पंचपेडवा), जमालुद्दीनपुरा आणि सलेमपुरा येथे उंटांची कत्तल करण्यात येणार आहे. या कत्तलीवर प्रतिबंध घालण्यासाठी अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखालील अधिवक्त्यांच्या शिष्टमंडळाने वाराणसीच्या आयुक्तांना निवेदन दिले. यापूर्वी जिल्हाधिकार्यांनाही याविषयी निवेदन देण्यात आले होते.
वर्ष २०१५ मधे जिल्हाधिकार्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांना उंटांच्या कत्तलीवर प्रतिबंध घालण्याचा आदेश दिला होता; मात्र त्यावर कारवाई करण्यात न आल्याने वरील तीनही ठिकाणी उंटांची कत्तल करण्यात आली, असे श्री. त्रिपाठी यांनी या वेळी सांगितले. (अशा अधिकार्यांवर कायदाद्रोह केल्याच्या प्रकरणी कारवाई केली पाहिजे ! हिंदूंच्या मंदिरांच्या ठिकाणी पशू बळी देण्याला विरोध करणार्या संघटना मुसलमानांकडून देण्यात येणार्या बळींच्या विषयी नेहमीच मौन बाळगतात ! - संपादक)
शिष्टमंडळात अधिवक्ता नीरज कुमार शुक्ला, अभय अग्निहोत्री, संजीवन यादव, राजेशसिंह कुशवाहा, सोनू कुमार, विनोद पाण्डेय उपाख्य भैयाजी, विकासकुमार सिंह, गुरुप्रसाद पाण्डेय, शशि यादव, दुर्गा प्रसाद, संदीप कुमार सिंह, बृजेश सिंह, संजीवन सिंह आदी अधिवक्ता सहभागी होते.