![]() |
श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांची हिंदुत्वनिष्ठांनी भेट घेतली त्या वेळी त्यांना निवेदन सादर करतांना हिंदुत्वनिष्ठ |
शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची खणखणीत चेतावणी
केसनंद (जिल्हा पुणे) येथे होणार्या सनबर्न या पाश्चात्त्य संगीत महोत्सवाला होणार्या विरोधाची धार तीव्र !
पुणे, १९ डिसेंबर (वार्ता.) - मादक पदार्थांच्या सेवनाला प्रोत्साहन देणार्या आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवणार्या सनबर्न फेस्टिव्हलला अनुमती देण्यात येऊ नये अन्यथा हिंदुत्वनिष्ठ संघटना सनबर्न फेस्टिव्हल बंद पाडतील, अशी खणखणीत चेतावणी शिवसेनेचे खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली आहे. खासदार श्री. पाटील यांनी तसे पत्रही जिल्हाधिकारी सौरभ राव आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांना दिले आहे. १८ डिसेंबर या दिवशी सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांनी श्री. पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी याची नोंद घेत तत्परतेने पोलीस आणि प्रशासन यांच्याशी पत्रव्यवहार केला.