![]() |
श्री. दीपक केसरकर (उजवीकडे) यांना निवेदन देतांना श्री. अरविंद पानसरे |
नागपूर - मागील वर्षी गोवा येथे झालेल्या सनबर्न फेस्टिव्हलमध्ये अमली पदार्थविरोधी पथकाला त्या ठिकाणी शेकडो जण सार्वजनिकरित्या हुक्का आणि चिलीम पीत असतांना, तसेच अनेक जण तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या प्रसाधनगृहांत अमली पदार्थांचे सेवन करत असतांना पहायला मिळाले. सहस्रो जणांकडून नो स्मोकिंग झोनमध्ये धूम्रपान करण्यात येत होते. त्या वेळी पोलिसांनीही मोठ्या प्रमाणात दंड वसुली केली होती. सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांनी हा ड्रग्ज-फ्री इव्हेंट आहे, असे कितीही सांगितले, तरी या ठिकाणी अमली पदार्थांच्या सेवनाचा मुक्त संचार असतो, हा आतापर्यंतचा पोलीस आणि अंमली पदार्थविरोधी पथक यांचा अनुभव आहे.